Shirdi sai baba wikipedia in marathi
Saibaba Information In Marathi भारतामध्ये प्रत्येक किलोमीटरवर एक मंदिर आहे असे म्हटले तरी वागे ठरणार नाही. त्यातही काही मंदिर किंवा देवस्थाने अतिशय प्रसिद्ध असून, अगदी परदेशातून देखील अनेक लोक या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी येत असतात. असेच एक जगभरात प्रसिद्ध असणारे देवस्थान म्हणून शिर्डी संस्थानाला ओळखले जाते. आणि येथील देव म्हणून पुजले जाणारे व्यक्ती म्हणून साई बाबा यांना ओळखले जाते. साईबाबा हे भारतामध्ये होऊन गेलेले एक अध्यात्मिक गुरु होते. ज्यांना भगवान शिवांचा अवतार म्हणून देखील ओळखले जाते.
साईबाबा यांची संपूर्ण माहिती Saibaba Information In Marathi
या ठिकाणाचे वैशिष्ट्ये म्हणजे येथे हिंदू व मुस्लिम अशा दोन्ही समाजाच्या लोकांद्वारे भेटी दिल्या जातात. व अतिशय भक्तिभावाने यांना पुजले जाते. काही लोकांच्या मते भगवान शिव यांचा अवतार असलेले साईबाबा इतर काही लोकांच्या मते दत्तात्रय प्रभूंचा देखील अवतार आहेत, असे सांगितले जाते.
आज शिर्डी संस्थानाला दररोज कित्येक लोक भेट देत असतात. या ठिकाणी मुस्लिम पद्धतीप्रमाणे उपासना करण्याबरोबरच हिंदू वैदिक पद्धतीने देखील पूजा अर्चा केली जाते. हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणून देखील या शिर्डीच्या संस्थानाला ओळखले जाते.
साईबाबा यांनी आपल्या संपूर्ण जीवनामध्ये अनेक चमत्कार दाखवलेले आहेत, त्यामुळे त्यांना खूप मोलाचे स्थान दिले जाते. साईबाबा हिंदू होते की मुस्लिम याबाबत कोणालाही माहिती नसले, तरी देखील याबाबत कोणीही जाणून घ्यायचा देखील प्रयत्न करत नाही. कारण त्यांनी सर्वधर्म समभावाची देखील शिकवण दिली होती, आणि त्यांचेच शिकवण आज आचरणात आणत अनेक लोक या ठिकाणी भेट देत असतात.
या संस्थांनामुळे अनेक लोकांना रोजगार प्राप्त झालेला असून, अनेकांचे कल्याण देखील झालेले आहे. आजच्या भागामध्ये आपण या शिर्डीच्या साईबाबांच्या बद्दल संपूर्ण माहिती बघणार आहोत…
नाव | श्री संत साईबाबा |
जन्म दिनांक | २८ सप्टेंबर १८३६ |
अवगत भाषा | उर्दू आणि मराठी |
तीर्थक्षेत्र | शिर्डी, अहमदनगर, महाराष्ट्र |
नागरिकत्व | भारतीय |
प्रसिद्ध वाक्य | श्रद्धा आणि सबुरी |
मृत्यु दिनांक | १५ ऑक्टोबर १९१८ |
मृत्यू स्थळ | शिर्डी |
श्री संत साईबाबा यांचे प्रारंभिक आयुष्य:
२८ सप्टेंबर १८३६ या दिवशी प्रसिद्ध संत व तत्वज्ञ श्री संत साईबाबा यांचा जन्म झाला होता, मात्र त्यांच्या जन्म ठिकाणाबद्दल कोणालाही माहिती नाही. असे म्हटले जाते की श्री संत साईबाबा यांचा जन्म एका हिंदू ब्राह्मण कुटुंबामध्ये झाला होता, मात्र काही कारणाने एका मुस्लिम सुफी व्यक्तीने त्यांना दत्तक घेतले.
तर काही लोक असे देखील सांगतात, की लिंबाच्या झाडापासून या साईबाबांचा जन्म झालेला आहे. त्यांनी लहानपणापासूनच आपल्या असाधारण क्षमतेने अनेक चमत्कार करून दाखवले होते. पुढे फिरत फिरत ते महाराष्ट्राच्या शिर्डी या गावी आले. ते वर्ष १८९८ होते. त्यावेळी त्यांनी याच गावांमध्ये वास्तव्य करून, एका पडक्या मशिदीला आपले घर बनवले.
ते विविध लोकांना सुफी पद्धतीने धुनी देण्याचे कार्य करत असत. ते हिंदू व मुस्लिम अशा दोन्ही स्वरूपांच्या प्रथा परंपराने जगणारे होते. त्यांना कुराण अवगत असण्याबरोबरच, भगवद्गीता देखील तोंडपाठ होती. ते हिंदू व मुस्लिम समाजाच्या लोकांना प्रबोधन करत असत.
त्यामुळे त्यांच्या भक्तांमध्ये या दोन्ही समाजाच्या लोकांचा मोठ्या प्रमाणावर समावेश होत आहे. पारशी भाषेमध्ये साई या शब्दाचा वापर केला जातो, तर बाबा हा मराठी भाषेतील आदराचा शब्द आहे. त्यामुळे या दोन्ही भाषांच्या मिश्रणातून या साईबाबांचे नाव तयार झालेले आहे.
संत साईबाबा यांचे शिर्डी मधील आगमन:
मित्रांनो १९९८ यावर्षी वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षात पदार्पण करत असताना अहमदनगरच्या शिर्डी गावांमध्ये संत साईबाबांनी प्रवेश केला, आणि तिथेच आजन्म आपले वास्तव्य केले. ते सुरुवातीला एका पडक्या मशिदीमध्ये राहत असत, त्यामुळे त्यांना अनेक मुस्लिम लोकांचे सहकार्य लाभले होते.
त्याचबरोबर ते हिंदू लोकांच्या पद्धतीने देखील विविध पूजा चर्चा करत असत. त्यामुळे त्यांच्या धर्माबद्दल नेहमीच गुड राहिलेले आहे. ते घरोघरी भिक्षा मागून आपला उदरनिर्वाह चालवत असत, आणि देवाच्या नामस्मरणामध्ये तल्लीन राहत असत.
संत साईबाबा यांनी दिलेल्या शिकवणी:
संत साईबाबा यांनी समाजाला योग्य वळणावर घेऊन जाण्यासाठी अनेक शिकवणी दिलेले आहेत, त्यांच्या प्रवचनांमध्ये अनेक चांगल्या तत्त्वांचा देखील उल्लेख आढळत असतो.
आपल्या वडीलधाऱ्या लोकांचा, शिक्षकांचा, तसेच आई-वडिलांचा आदर करावा असे ते नेहमी सांगत असत. अशा पद्धतीने आपण त्यांचा आशीर्वाद मिळवून कोणत्याही कार्यामध्ये यशस्वी होऊ शकतो, असे ते नेहमी सांगत असत.
मानवाने नेहमी दयाळू असले पाहिजे, प्राणिमात्रावर दया करण्याबरोबरच माणसांमधील देखील द्वेष विसरून एकत्र आले पाहिजे, जेणेकरून समाजाची ताकद वाढण्यास मदत होईल असे ते नेहमी सांगत असत. आपापल्या ऐपतीप्रमाणे आपण नेहमी गरीब लोकांची व असाह्य लोकांची मदत केली पाहिजे, यावर त्यांचा विश्वास होता.
पृथ्वीवर अस्तित्वात असलेल्या जातपाती किंवा भेदभाव हे देवाला देखील मान्य नाहीत, त्यामुळे मानवाने या सर्व गोष्टींच्या पलीकडे जाऊन चांगले कार्य करावे, असा सल्ला प्रत्येक प्रवचनामध्ये देत असत. प्रत्येक गोष्ट श्रद्धा ठेवून करावी, व त्यासाठी थोडीशी सबुरी राखावी हे त्यांचे प्रसिद्ध वचन आहे.
निष्कर्ष:
भारत हा पूर्वीपासूनच गुण्यागोविंदाने नांदत आलेला देश आहे. येथे पहिल्यापासून काही प्रमाणामध्ये धर्म भेदभाव असला, तरी देखील अनेक लोक हा धर्मामधील भेद विसरून सर्वधर्म समभावाच्या गोष्टी समाजामध्ये रुजवण्याचे काम अनेक संत महात्म्यांनी केलेले आहे. असेच एक संत म्हणून शिर्डीच्या संत साईबाबा यांना ओळखले जाते.
त्यांनी सर्व धर्म समभावाची शिकवण दिल्यामुळे, आज त्यांच्या भक्तगणांमध्ये हिंदू व मुस्लिम अशा दोन वेगवेगळ्या धर्माच्या लोकांची संख्या फार मोठी आहे. आज शिर्डी संस्थानाची लोकप्रियता परदेशात पोहोचलेली असून, या ठिकाणी दररोज देशांतर्गत व परदेशी पर्यटक भेट देत असतात.
आजच्या भागामध्ये आपण या शिर्डीच्या साईबाबांच्या विषयी संपूर्ण माहिती बघितली आहे. ज्यामध्ये त्यांचा जन्म, त्यांची प्रारंभिक माहिती किंवा आयुष्य, त्यांचे अनुयायी, त्यांचे विविध चमत्कार, शिर्डीच्या साईबाबांनी दिलेली शिकवण, आणि त्यांची प्रसिद्ध वचने, त्याचबरोबर त्यांनी प्रवचनामध्ये दिलेले ज्ञान, त्यांचे शिर्डी येथील मंदिर, व त्यांचा मृत्यू इत्यादी गोष्टींबद्दल माहिती बघितली आहे. सोबतच शिर्डीच्या आसपास असणाऱ्या ठिकाणांची देखील माहिती बघितली असून, या ठिकाणी पोहोचण्याचे मार्ग देखील सांगितलेले आहेत.
FAQ
साईबाबा यांचा जन्म कोणत्या दिवशी झाला होता?
साईबाबा यांचा जन्म २८ सप्टेंबर १८३६ या दिवशी झाला होता.
साईबाबा कोणकोणत्या भाषा जाणत होते, व ते आपले प्रवचन कोणत्या भाषेमध्ये करत असत?
साईबाबा यांना मराठी व उर्दू या दोन भाषा अवगत होत्या. समोरील श्रोते ज्या स्वरूपाची भाषा समजत असतील, त्या स्वरूपाच्या भाषेमध्ये ते आपले प्रवचन देत असत.
श्री संत साईबाबा यांचे कार्यक्षेत्र कोणत्या ठिकाणाला समजले जाते, व त्यांची समाधी कोठे आहे?
श्री संत साईबाबा यांचे कार्यक्षेत्र म्हणून महाराष्ट्राच्या आमदनगर जिल्ह्यामधील शिर्डी या ठिकाणाला समजले जाते. व त्यांची समाधी देखील याच शिर्डी ठिकाणी वसलेली आहे.
श्री संत साईबाबा यांनी कोणती प्रसिद्ध वचने सांगितलेली आहेत?
श्री संत साईबाबा यांनी अल्लाह मलिक आणि श्रद्धा व सबुरी ही प्रसिद्ध वचने सांगितलेली आहेत.
श्री संत साईबाबा यांचे निधन कोणत्या दिवशी, व कोणत्या ठिकाणी झाले होते?
श्री संत साईबाबा यांचे निधन १५ ऑक्टोबर १९१८ या दिवशी शिर्डी या ठिकाणी झाले होते. आणि याच ठिकाणी त्यांची समाधी बांधून आज मोठे मंदिर उभे केलेले आहे. येथे दर वर्षी लाखो भाविक भेट देत असतात.